Whatsapp

भारतीय जनता पक्षाचे नेते, बुलंद नेतृत्व उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त भाजप शहराध्यक्ष मा.श्री. शंकरशेठ जगताप यांच्या संकल्पनेतून संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात एकाचवेळी ५३,००० झाडांचे वृक्षारोपण महाअभियान राबविले जात आहे.
विशालनगर, पिंपळे निलख येथील रामसृष्टी सह. गृहनिर्माण सोसायटी समोरील मैदानात ही वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली.
याप्रसंगी माजी खासदार अमर साबळे, भाजप शहराध्यक्ष शंकर शेठ जगताप, माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, गटनेते नामदेव ढाके, सदाशिव खाडे, गणेश कसप्टे, महिला अध्यक्षा उज्ज्वला गावडे, बहुसंख्येने विद्यार्थी, कार्यकर्ते आणि पिंपळे निलख मधील सन्मानीय नागरिक आदी उपस्थित होते.

निसर्ग संवर्धनासाठी कार्यरत असणाऱ्या पिंपळे निलख येथील, पिंपळवन निसर्ग संवर्धन ग्रुप तर्फे जागतिक वसुंधरा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संरक्षण खात्याच्या अत्यारिखित येणाऱ्या जमिनीवर पिंपळवन निसर्ग संवर्धन ग्रुपमार्फत वृक्ष लागवड करण्यात आली आहे. या वृक्षांची निगा ग्रुप मार्फत नियमित राखली जाते.
वसुंधरा दिनाच्या निमित्ताने लागवड केलेल्या वृक्षांना खतपाणी घातले गेले.
तसेच, विशाल नगर परिसरामध्ये निसर्गाच्या संगोपनासाठी लोकांमध्ये जागृती करण्यासाठी प्रभात फेरी देखील काढण्यात आली. विशालनगर येथील गणपती चौकामध्ये या प्रभात फेरीचा समारोप करण्यात आला.

समस्त ग्रामस्थ मंडळी पिंपळे निलख यांच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या शुभारंभप्रसंगी उपस्थित होतो.
यंदाच्या हरिनाम सप्ताहाचे हे २४ वे वर्ष आहे.
एका गोष्टीचा मला विशेष आनंद वाटतो की, हरिनाम सप्ताहाच्या सुरुवाती पासूनच मी या उपक्रमाशी जोडले गेलो, पहिल्या वर्षी बाबासाहेब इंगवले यांच्या अध्यक्षतेखाली या कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली होती आम्ही सर्वांनी मिळून लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष झालेला पाहून विशेष आनंद होत आहे. पिंपळे निलख मधील तरुण पिढीने देखील अतिशय मनोभावे ही धार्मिक परंपरा कायम ठेवली याचे विशेष समाधान वाटते.
या प्रसंगी, चिंचवड विधानसभेच्या नवनिर्वाचित आमदार श्रीमती अश्विनीताई जगताप, कीर्तनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज बोरकर शास्त्री बहुसंख्येने ग्रामस्थ मंडळी, भागवत संप्रदायातील सन्मानीय मान्यवर आदी उपस्थित होते.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या औचित्याने सचिन साठे सोशल फाऊंडेशन तर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि मिठाई वाटप करण्यात आले. आपण स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करीत असताना, पुढील 25 वर्षांत देशाचे कर्तेधर्ते असणाऱ्या पुढील पिढीच्या शैक्षणिक वाटचालीत हातभार लावावा अशी आम्हा सर्व कार्यकर्त्यांची या उपक्रमा मागील भूमिका होती. पिंपळे निलख परिसरातील, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत, पर्ल ड्रॉप हायस्कूल तसेच विशाल नगर आणि कस्पटे वस्ती येथील महानगरपालिकेच्या शाळेत, विशाल नगर मिल्की वे हायस्कूल या शाळांमध्ये प्रथम टप्प्यात हा उपक्रम राबविण्यात आला. या प्रकारे 4000 विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप करण्याचे सचिन साठे सोशल फाऊंडेशनचे उदिष्ट आहे .