समस्त ग्रामस्थ पिंपळे निळख आणि सचिन साठे सोशल फाऊंडेशन तर्फे श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथील ऐतिहासिक मंदिर प्राणप्रतिष्ठापणा निमित्त आधुनिक वाल्मिकी ग.दी.माडगुळकर रचित , स्वरतीर्थ सुधीर फडके स्वररचित गीत रामायण सुप्रसिद्ध गायक तुषार रिठे आणि वृंद यांच्या सुमधुर गायनाने संपन्न झाले . श्री भैरवनाथ-विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर , पिंपळे निलख गावठाण येथे महाआरती संपन्न होऊन भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले . चिंचवड विधानसभेच्या आमदार श्रीमती अश्विनीताई लक्ष्मण जगताप यांची प्रमुख उपस्थिती या समारंभास लाभली .