Whatsapp

Sachin Sathe

आपल्या कार्यकर्त्यांमध्ये आणि जनमानसात "भाऊ" या नावाने सुपरिचित असणारे सचिन साठे हे पिंपरी चिंचवड मधील भूमीपुत्रांमधून पुढे आलेल्या नेतृत्वांपैकी एक आघाडीचे नाव आहे . सचिन साठे यांचे चुलते तथा थोर स्वातंत्र्यसैनिक कै.भाऊसाहेब साठे यांचा जनसामान्यांच्या सेवेचा आणि राष्ट्रभक्तीचा वारसा सचिन साठे खऱ्या अर्थाने पुढे चालवत आहेत.

महनमंगल अश्या स्वातंत्र्यदिनी अर्थात १५ ऑगस्ट १९७३ रोजी पवित्र मुळा नदीच्या किनारी वसलेले पिंपळे निलख याठिकाणी सचिन साठे यांचा जन्म झाला. घरातील स्वातंत्र्यलढ्याचा वारसा आणि भाऊंचा स्वातंत्र्यदिनी झालेला जन्म हा जणू दुग्धशर्करा योगायोगच म्हणावा.

आपले प्राथमिक शिक्षण पिंपळे निलख येथे तर, माध्यमिक शिक्षण शिवाजीनगर, पुणे येथील भारत इंग्लिश स्कूल मध्ये पूर्ण करून, श्री. सचिन साठे यांनी पुण्यातील सुप्रसिद्ध अश्या फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश मिळवला. कला शाखेतील पॉलिटिकल सायन्स मधील पदवी १९९८ साली भाऊंनी प्राप्त केली. कला शाखेतील पॉलिटिकल सायन्स मधील पदवी १९९८ साली भाऊंनी प्राप्त केली. कॉलेज दरम्यान, कॉलेज जीवनात भाऊंचे मन मात्र अधिक रमले ते विद्यार्थी चळवळीत आणि खेळाच्या मैदानावरच.!

उपजत राजबिंडी उंची, कमावलेली बलदंड शरीरयष्टी आणि अंगातील चपळता यांमुळे अल्पवधीतच एक आघाडीचे कब्बडीपट्टू म्हणून सचिन साठे यांचा लौकिक झाला. सुरुवातीला श्री छत्रपती संघ आणि नंतर पुण्यातील महाराणा प्रताप कबड्डी संघाकडून अनेक जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमधून खेळण्याची संधी सचिनभाऊ यांना मिळाली आणि त्या बहुतेक स्पर्धांमध्ये भाऊंच्या संघाने विजेतेपद मिळवले. महाराणा प्रताप संघातील भाऊंचा समावेश हा खऱ्या अर्थाने त्यांच्या क्रीडा कारकिर्दीला गती देणारा ठरला. महाराणा प्रताप संघात भाऊंना अर्जुन पुरस्कार विजेते श्री. शांताराम (बाप्पू) जाधव तसेच महाराणा प्रताप संघाचे संस्थापक आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्री. शरद (अण्णा) चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.

Journey

कॉलेज जीवनात, भाऊंना 1997-1998 साली पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज चा विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी प्राप्त झाली. याचदरम्यान स्टुडंट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम अंतर्गत तत्कालीन विद्यार्थ्यांबरोबर फ्रान्स दौरा करून, त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले.

भाऊंनी फर्ग्युसन कॉलेज कडून, खेळताना आंतरमहाविद्यालयीन कब्बडी चॅम्पियनशिप त्यांच्या नेतृत्वाखाली मिळवून दिली. त्याचदरम्यान, दुबई येथे 2000 साली झालेल्या दुबई इंटरनॅशनल कब्बडी टूर्नामेंट त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र संघाकडून सहभाग घेतला आणि त्यांचा संघ विजेता ठरला. पुढे राष्ट्रीय पातळीवर पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करताना सलग तीन वर्षे राष्ट्रीय पातळीवर स्पर्धांमध्ये भाऊ संघाचा अविभाज्य भाग होते. क्रीडा क्षेत्रातील कामगिरीसाठी १९९८-९९ सालासाठी थोर समाजसेवक श्री. बाळासाहेब भारदे यांच्या हस्ते त्यांना प्रतिष्ठेच्या महाराणा प्रताप अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले.

क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी करीत असताना विद्यार्थ्यांचे संघटनकार्य भाऊंनी आपल्या नेतृत्वगुणांनी सुरू ठेवले. यादरम्यान पारितोषिक वितरण समारंभ व कॉलेज मधील इतर कार्यक्रम यानिमित्ताने भाऊंच्या अचूक नियोजनकौशल्याची चुणूक सर्वांनाच दिसली. विद्यार्थी चळवळीमधील आपली आक्रमकता दाखवताना विद्यार्थ्यांना संघटित करून, २००२ साली पुणे विद्यापीठाच्या फी वाढीविरोधात त्यांनी यशस्वी आंदोलन केले आणि आपल्या मागण्या विद्यापीठाला मान्य करायला लावल्या. विद्यार्थी चळवळीतील नेतृत्व पुढे जाऊन काँग्रेस पक्षामधून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली.

१९९८ ते २००४ सालापर्यंत ६ वर्षे - National Students' Union of India (NSUI) चे जिल्हाध्यक्ष, २००२-२००८ या दरम्यान महाराष्ट्र प्रदेश युवक उपाध्यक्ष , २००८-२०१४ या दरम्यान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव २०१४-२०२० या दरम्यान सचिन भाऊ साठे यांनी पिंपरी चिंचवड काँग्रेस शहराध्यक्षपद अशी पदे भूषवली.

२४ फेब्रुवारी २०२३ रोजी भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे, उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र जी फडणवीस आणि आमदार अश्विनीताई जगताप, मा. शंकरशेठ जगताप यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला. तदनंतर भारतीय जनता पार्टीच्या ध्येयधोरणांनुसार राजकीय तथा सामाजिक जीवनात ते कार्यरत आहेत.

पक्षीय जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत असताना, शहराच्या दृष्टीने, महत्वाच्या स्थानिक प्रश्नांवर देखील सचिन भाऊंनी विशेष लक्ष दिले आणि ते प्रश्न सोडवले. यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करायचा झाल्यास, पिंपळे निलख येथील पाण्याच्या टाकीचे तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्या कडे पाठपुरावा करून भूमिपूजना पासून, पूर्ण करून घेतलेले काम, स्वारगेट-पिंपळे निलख-स्वारगेट अशी PMPL तर्फे भाऊंच्या पाठपुराव्याने सुरू करण्यात आलेली बससेवा, प्रभागात कचरा वेचणाऱ्या घंटा गाड्या, शहर विकास आराखडा प्रभावीपणे राबविण्यासाठी केलेले प्रयत्न अशी अनेक कामे सांगता येतील.

लहान-मोठ्या सर्वांशीच सुसंवाद, मृदू स्वभाव आणि प्रत्येकाच्या मदतीला प्रामाणिकपणे धावून जाण्याची वृत्ती यांमुळे पक्षीय परिघाबाहेर सचिन भाऊंचा अफाट मित्र परिवार आहे.

सचिन भाऊ हे सर्वपल्ली व्यक्तिमत्त्व असल्याने कला, क्रीडा, समाजसेवा, साहित्यिक, चित्रपट, विज्ञान अश्या अनेक मान्यवरांशी त्यांची चांगलीच गट्टी जमली.

पक्ष संघटनेसोबतच, सामाजिक उपक्रमांचा डोंगरच जणू उभा केला. सचिन भाऊ साठे यांनी गेल्या २५ वर्षांच्या कालखंडात सचिन साठे सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेक समाजऊपयोगी उपक्रम राबविले विशेष म्हणजे, गेल्या 25 वर्षांपासून त्यात कमालीचे सातत्य राहिले आहे. दरवर्षी १५ ऑगस्ट च्या निमित्ताने पार पडणारा विद्यार्थी गुणगौरव समारंभ याला तर १८ वर्षांची परंपरा आहे.

आजवर सचिनभाऊ यांनी केलेल्या सामाजिक कामामध्ये स्व. भाऊसाहेब स्मृती व्याख्यानमाला अंतर्गत ०८ वर्षे २४ व्याख्याने आयोजित करण्यात आली. या अंतर्गत महाराष्ट्रातील अनेक नावाजलेले व्याखाते यांनी या व्याख्यानमालेमध्ये पुष्प गुंफले. त्यामध्ये थोर समाजसेविका सिंधूताई सपकाळ, प्रा. नितीन बानगुडे पाटील, अनुराधा प्रभू देसाई, डॉ. रमा मराठे, राशीचक्राकार शरद उपाध्ये, विद्यावाचस्पती रामचंद्र देखणे, उमेश कणकवलीकर आदी दिग्गज व्याख्याते यांचा समावेश आहे.

इतर सामाजिक उपक्रमांमध्ये, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, डोळे तपासणी शिबीर, स्वयंरोजगार मेळावा, एड्स प्रतिबंधात्मक जागृती कॅम्प, समाजसेवक बाबा आमटे यांच्या आनंदवनातील मुलांना वस्तूरुपी मदत, गरजू मुलांना शालेय वस्तू वाटप, शाळांना कॉम्प्युटरचे वाटप, परिसरातील जेष्ठ नागरिकांसाठी तीर्थक्षेत्र यात्रा-सहलीचे आयोजन असे समाजउपयोगी कार्यक्रम यामध्ये समाविष्ट आहे.

आजही गेल्या 25 वर्षांपासून पिंपरी चिंचवडचा हा भूमिपुत्र अविरतपणे जनसेवेसाठी व्यस्त आहे.