आपल्या कार्यकर्त्यांमध्ये आणि जनमानसात "भाऊ" या नावाने सुपरिचित असणारे सचिन साठे हे पिंपरी चिंचवड मधील भूमीपुत्रांमधून पुढे आलेल्या नेतृत्वांपैकी एक आघाडीचे नाव आहे . सचिन साठे यांचे चुलते तथा थोर स्वातंत्र्यसैनिक कै.भाऊसाहेब साठे यांचा जनसामान्यांच्या सेवेचा आणि राष्ट्रभक्तीचा वारसा सचिन साठे खऱ्या अर्थाने पुढे चालवत आहेत.
महनमंगल अश्या स्वातंत्र्यदिनी अर्थात १५ ऑगस्ट १९७३ रोजी पवित्र मुळा नदीच्या किनारी वसलेले पिंपळे निलख याठिकाणी सचिन साठे यांचा जन्म झाला. घरातील स्वातंत्र्यलढ्याचा वारसा आणि भाऊंचा स्वातंत्र्यदिनी झालेला जन्म हा जणू दुग्धशर्करा योगायोगच म्हणावा.
आपले प्राथमिक शिक्षण पिंपळे निलख येथे तर, माध्यमिक शिक्षण शिवाजीनगर, पुणे येथील भारत इंग्लिश स्कूल मध्ये पूर्ण करून, श्री.सचिन साठे यांनी पुण्यातील सुप्रसिद्ध अश्या फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश मिळवला.
Read More